शोधाशोध

Sunday, January 31, 2010

तोंडओळख ऑफ मिस्टर दामाजीपंत

' दाम '..... म्हणजे पैसा. कलयुगातला सर्वधर्मीय लोकांचा देव !

पूर्वीच्या काळी , म्हणजे आपल्या आ़जीच्या काळात , पैशाला 'दामाजीपंत' असं आदराने आणि गंमतीने म्हटलं जात असे. तर मग म्हटलं , त्यांवरच ब्लॉग का लिहू नये. म्हणून मग या ब्लॉगवर मी ह्याच दामाजीपंतांना प्रत्येकाने आपल्या घरी कसं आणावं याबाबत मार्गदर्शन करणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी इथे सगळ्या प्रकारच्या लहान-मोठ्या व्यवसायाविषयीचं मार्गदर्शन करणार आहे.

लघु उद्योग
घरगुती उद्योग
खास स्त्रियांसाठीचे उद्योग
खास तरूणांसाठीचे उद्योग
खास ज्येष्ठांसाठीचे उद्योग
अगदी शाळकरी मुलांसाठी उपयुक्त असणारे उद्योग सुद्धा...

आणि उद्योगही बर्‍याच प्रकारचे आहेत , उदा.

इंटरनेटवरचे उद्योग , घरबसल्या करण्याचे उद्योग , हॉटेल व्यवसाय , रिअल इस्टेट ,कमिशन एजंट , यांच्यासारख्या सर्वश्रुत असलेल्या व्यवसायांबरोबरच , फारसे प्रसिद्ध नसलेले पण प्रचंड नफ्याची संधी असलेले उद्योग, विना-भांडवलीचे उद्योग, तसंच कमी भांडवलातले उद्योग, आणि अगदी नवीन असलेले, तुम्ही प्रथम कधीही न ऐकलेले व्यवसायही मी इथे देणार आहे. तेव्हा या सगळ्या माहितीचा उपयोग करून घ्या, आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

हा ब्लॉग लिहिण्यामागचा माझा हेतू एकच कि...
मनाने गर्भश्रीमंत असणार्‍या मराठी माणसाने आता पैशाने सुद्धा श्रीमंत व्हावं.

जर कसली शंका असेल तर विचारण्यास संकोच करू नका, बिनधास्तपणे विचारा.

भेटूयात्......लवकरच.....

तो पर्यंत........ धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Post a Comment

मित्रांना देखील कळवा