तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?
बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........
दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी संबंधित काही इंटरनेटवरचे , म्हणजेच ऑनलाईन व्यवसाय देत आहे, त्यातला जो तुम्हाला आवडेल, सोपा वाटेल तो पर्याय निवडावा.
आधी ऑनलाईन व्यवसाय बघूयात :- फोटो विकणे
आपण वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, टि.व्ही., इंटरनेट, इ. ठिकाणी विविध प्रकारच्या जाहिराती करणार्या जाहिरात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, विषयावरच्या आणि वेगवेगळ्या कल्पनेवर आधारलेल्या ,फोटोग्राफ्स ची कायम गरज असते. त्यासाठी ते वाट्टेल तेवढे पैसे खर्च करायला तयार असतात.
त्यामुळे जर तुमची फोटोग्राफी अतिशय उच्च दर्जाची असेल तर तुम्ही थेट जाहिरात कंपनीशी संपर्क साधून तुमचे फोटो त्यांना विकू शकता. जर तुम्हाला जाहिरात कंपनीकडे थेट जाणं जमत नसेल, तर तुम्ही एखाद्या अशा मध्यस्थ कंपनी कडे जाऊन तुमचे फोटो विकू शकता, जी कंपनी मोठ्या जाहिरात कंपन्यांना फोटो पुरवते.
मी इथे काही मध्यस्थ कंपन्यांची माहिती देत आहे, त्याचा आपण उपयोग करून घ्यावा. :-
१) फोटोलिआ हि अशीच एक मध्यस्थ कंपनी आहे, जिथे तुम्ही तुमचे फोटो त्यांना दाखवायचे, त्यांपैकी त्यांना आवडतील तेवढे फोटो ते घेतात आणि त्याचे पैसे तुम्हाला देतात.
२) या कंपनीची पद्धत थोडी वेगळी आहे, ही कंपनी तुम्हाला डाऊनलोड्स वर पैसे देते. म्हणजे तुमचा फोटो किती एकदा डाऊनलोड केला गेला तर त्याबद्दल तुम्हाला, एका डाऊनलोड मागे कमीतकमी २५ रुपयांपासून ते जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.
उदा. तुमचा एखादा अतिशय चांगला आलेला फोटो , समजा 'एकदा' डाऊनलोड केला गेला तर, तुम्हाला त्यासाठी २५ रु. , म्हणजे जर एका दिवसात तुमचा फोटो किमान १० जरी वेळा डाऊनलोड केला गेला, तर (२५ गुणिले १० =२५० रु. ) एवढे पैसे मिळतील तुम्हाला. आता एका दिवसाला रु.२५०/- म्हणजे महिन्याचे किती ? जवळपास ७५००/- रुपये. विश्वास नाही ना बसत... पण खरं आहे हे. अर्थात त्यासाठी तुमचा फोटो तेवढ्या योग्यतेचा असायला पाहिजे . अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : आयस्टॉक
३) आता आणखी एक गंमतीदार आणि सगळ्यात सोपी पद्धत असणारी मध्यस्थ कंपनी:- शेअर्पिक, जी आपल्याला फक्त फोटो शेअर करण्यासाठी पैसे देते. म्हणजे तुम्ही फक्त तुमचे फोटो त्यांच्या वेबसाईट्वर अपलोड करायचे , जेव्हा जेव्हा कुणी ते फोटो नुसते पाहिल, तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. आहे कि नाही गंमत ?? आता तुम्हाला वाटत असेल कि, या कंपनीच्या मालकाकडे पैसे जास्त झाले असावेत बहुधा, पण हे खरं आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : शेअर्पिक.
अशा सोप्या सोप्या मार्गाने इतके लोक पैसे कमवतायत, मग तुम्ही का नाही ? आणि शिवाय इथे तुम्हाला स्वतःच्या खिशातील एक दमडीदेखील खर्च करायची नाही किंवा तुमच्या सभासदत्वाखाली इतर सभासदांची कसली साखळी वगैरे सुद्धा तयार करायची नाही. आता ह्याआधी या कंपन्यांकडून कुणी आणि किती पैसे कमावलेत ? , वगैरे प्रश्नांची उत्तरं त्या त्या कंपन्यांच्या ब्लॉगवर किंवा फोरममध्ये असतात, ती तुम्ही वाचू शकता. आणि प्रत्येक कंपनीचे फोटो सबमिट करण्यासंबंधीचे काही नियम आहेत, तेव्हा ते नियम वाचून मगच फोटो सबमिट करा.
फोटोग्राफी संबंधीचे आणखी काही ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवसाय आपण थोड्या कालावधीनंतर पाहूयात. तोपर्यंत या व्यवसायांसाठी हार्दिक शुभेच्छा !
बॉलीवूड आता लवकरच बिहारला स्थायिक होणार
-
शिवसेना आणि मनसे यांना कंटाळून बॉलीवूडकर मंडळी म्हणे आता बिहारचा रस्ता
धरणार आहेत. बिहार सरकारने यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून
मोर्चेबांधणी सुरू के...